May 28, 2026
IMG-20260529-WA0000

रोख रकमेसह लाखोंचा ऐवज जप्त

करमाळा, प्रतिनिधी – करमाळा पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलिसांनी तालुक्यातील कुंभारगाव येथे जुगार खेळताना आढळून आलेल्या ११ जणांवर गुन्हा दाखल करून रोख रकमेसह रु. २,०२,८४० चा मुद्देमाल जप्त केला आहे.

याबाबत पो.कॉ.मिलींद दहीहांडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि.२६/०५/२६ रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास करमाळा तालुक्यातील कुंभारगाव येथील बाळासाहेब देवराम आढाव यांच्या शेतात चिंचेच्या झाडाखाली दिपक जालिंदर पोळ (वय-३० वर्षे), रामचंद्र पांडुरंग सांळुखे (वय-३७ वर्षे), शिवाजी आप्पा पोळ (वय-५९ वर्षे), रामदास भानुदास पानसरे (वय-६५ वर्षे), केशव दत्तु भोसले (वय-६५ वर्षे), रामदास पोपट पोळ (वय-४५ वर्षे), यमाजी पोपट सोनवणे (वय-५५ वर्षे), महादेव शिवराम पोळ (वय-५९ वर्षे), सत्यवान अजिनाथ भालेराव (वय-४० वर्षे), नागेश कुंडलीक पोळ (वय-३० वर्षे) आणि ऋषीकेश रामदास कणसे (वय-२८ वर्ष सर्व रा. कुंभारगाव ता. करमाळा) हे ११जण ५२ पत्याच्या पानावर पैसे लावुन मन्ना नावाचा जुगार खेळताना मिळून आले आहेत.

या कारवाईत करमाळा पोलिसांनी रु.१८४० च्या रोख रकमेसह विविध कंपन्यांच्या दुचाकी आणि मोबाईल असा एकूण रु. २,०२,८४० चा मुद्देमाल जप्त करून महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे. पो.ह. सुहास पवार हे या गुन्हयाचा अधिक तपास करत आहेत.

.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!