June 11, 2026
IMG-20260118-WA0018(1)

करमाळा, प्रतिनिधी – तीन जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता हद्दपार असलेला तरुण शहरात फिरून दहशत निर्माण करत असल्या बाबतची माहिती मिळाल्यानंतर करमाळा पोलिसांनी त्याला पकडून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पो.कॉ. बापुसाहेब कोकाटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ओंकार दादासाहेब पुजारी (वय-२७ वर्षे रा. देवीचामाळ करमाळा) याला उपविभागीय दंडाधिकारी (माढा विभाग कुर्डुवाडी) यांनी सोलापुर, पुणे, अहमदनगर या तीन जिल्ह्यांच्या हद्दीतुन दोन वर्षांच्या कालावधीसाठी हद्दपार केले होते. परंतु तो हद्दपार कालावधीमध्ये करमाळा शहरातील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय परीसरात मिळून आला आहे. त्यामुळे त्याने हद्दपारीच्या आदेशाचा भंग केला आहे.

सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी ओंकार पुजारी याला बॉम्बे पोलीस ॲक्ट १४२ नुसार नोटीस देण्यात आल्याचे तसेच हद्दपार कालावधीत करमाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीत पुन्हा मिळून आल्यास त्याला अटक करून न्यायालयासमोर उभे करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी सांगितले आहे.

.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!