June 10, 2026
IMG-20260608-WA0025

पर्यावरण संवर्धनाची घेतली सामुहिक शपथ

करमाळा, प्रतिनिधी – शहरातील नवभारत इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा झाला. यावेळी शहरातील डॉक्टर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

वाढते प्रदूषण आणि बदलणारे हवामान या पार्श्वभूमीवर मानवी आरोग्य आणि पर्यावरण यांचा जवळचा संबंध अधोरेखित करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन केले गेले. यावर्षी शाळेकडून करमाळा डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ .सुनिता दोशी, अध्यक्ष डॉ. लोकरे, उपाध्यक्ष डॉ. प्रीती शेटे, डॉ.नेटके, डॉ. आटोळे, डॉ. सावंत, डॉ. राऊत, डॉ. घोलप, डॉ. सारंगकर, डॉ.जाधव, डॉ. परदेशी, डॉ. निंबाळकर, डॉ. पवार, डॉ.शिंदे, महीला डॉ.कांबळे, डॉक्टर सारंगकर, डॉ.खोसे, श्रीमती लावंड, डॉ. नेटके, डॉ. घोलप, डॉ.जाधव, डॉ. निंबाळकर, श्रीमती शिंदे यांच्या हस्ते शाळेच्या प्रांगणात विविध वृक्षांचे रोपण करण्यात आले.

केवळ वृक्षारोपण करून न थांबता लावलेल्या प्रत्येक झाडाचे संगोपन करण्याची तसेच पर्यावरण रक्षणाची शपथ उपस्थितांनी घेतली. या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष कन्हैयालाल देवी, तसेच सर्वेसर्वा सुनीता देवी, मुख्याध्यापिका अश्विनी देशमाने आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर वृंद उपस्थित होते. यावेळी सर्वांनी पर्यावरण संवर्धनाची सामुहिक शपथ घेतली.

.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!