June 21, 2026
IMG-20260621-WA0032

मांगी येथे सर्वपक्षीय रास्ता रोको

करमाळा, प्रतिनिधी : मांगी तलावातील पाणी हाळगाव येथील कृषी महाविद्यालयाला देण्याच्या शासन निर्णयाविरोधात मांगी तलाव लाभक्षेत्रातील २२ गावांतील शेतकरी व ग्रामस्थ आक्रमक झाले असून, या निर्णयाच्या निषेधार्थ उद्या सोमवार दि. २२ जून रोजी मांगी बसथांब्या जवळ टेंभुर्णी-अहिल्यानगर महामार्गावर सर्वपक्षीय रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.

मांगी तलाव हा पूर्णतः पावसाच्या पाण्यावर अवलंबून असून या भागातील पाणीटंचाई लक्षात घेता तलावातील पाणी बाहेर नेण्यास शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. या आंदोलनास पाठिंबा दर्शवत लाभक्षेत्रातील २२ गावांच्या ग्रामपंचायतींनी ठराव मंजूर केले आहेत.
शासनाने हा निर्णय तातडीने मागे घ्यावा अथवा मांगी तलावाला कायमस्वरूपी पाणी उपलब्ध होण्यासाठी कुकडी लाभक्षेत्रात समाविष्ट करण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी मांगी तलाव पाणी बचाव संघर्ष समितीने केली आहे.

या आंदोलनासाठी सर्व शेतकरी व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!