करमाळा, प्रतिनिधी – लक्ष्मीबाई रामचंद्र माळवे (वय-७०, रा. वरकुटे मूर्तीचे, हल्ली आदिनाथ नगर) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. आदिनाथ कारखान्याचे अधिकारी रामचंद्र माळवे यांच्या त्या पत्नी तर अनुलोम जनसेवक भाजप विधानसभा विस्तारक सरचिटणीस रवी माळवे यांच्या मातोश्री होत.
