हल्लेखोर आरोपीस अटक
करमाळा, प्रतिनिधी – शहरात सोमवारी रात्री एका युवकावर कोयत्याने वार करण्यात आले होते. याबाबत सदर युवकाने करमाळा पोलिसात फिर्याद दिली आहे.

या फिर्यादीत पुणे येथे शिक्षण घेत असलेल्या महेश दत्तात्रय आलाट (वय-१९ वर्षे, रा. रोशेवाडी, ता. करमाळा, जि. सोलापुर) याने म्हटले आहे की, दि. २२/०६/२०२६ रोजी रात्री ८.४५ वाजण्याच्या सुमारास करमाळा शहरातील खाटीकगल्ली येथील जीवनलाल किराणा दुकाना समोर आकाश धनंजय मंडलीक (रा. आण्णाभाऊ साठे नगर, करमाळा) याने तो नशा करत असल्याची माहिती फिर्यादीने त्याचे भावास सांगितल्याच्या संशयावरुन कोयत्याने फिर्यादीस पाठीत व डावे हाताचे पंजावर मारुन गंभीर जखमी केले आहे.

या फिर्यादीवरून करमाळा पोलिसांनी आरोपी आकाश धनंजय मंडलीक याच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ११८(२) नुसार गुन्हा दाखल करून आणि त्याचा तातडीने शोध घेऊन अटक केली आहे. आरोपीला आज (बुधवारी) न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असल्याची माहिती तपास अधिकारी पो.हे.कॉ. अभिजीत मोहोळकर यांनी दिली आहे.

.

.

.

.

