करमाळा, प्रतिनिधी – दर्जेदार साड्या व कपड्यांसाठी सर्वसामान्यांना परवडणाऱ्या विराज टेक्सटाईल मिल च्या करमाळा शहरातील दालनाचे रविवार दि. २८ जून २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता दिमाखात उद्घाटन झाले. या सोहळ्यात विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्यासह दिग्गज राजकीय नेते आणि सर्वसामान्यांची प्रमुख उपस्थिती होती.
विराज टेक्सटाईल मिल हे महाराष्ट्रातील दर्जेदार साड्या व कपड्यांसाठी प्रसिद्ध दालन आहे. या नामांकित ब्रॅण्डच्या करमाळा शहरातील श्री कमलादेवी रस्त्यावरील उड्डाणपुलाच्या पूर्व बाजूस मस्कर अँग्रोच्या शेजारी नव्याने साकारण्यात आलेल्या दालनाचे रविवार दि. २८ जून २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता हजारे परिवाराचे जेष्ठ सदस्य श्री. शिवदास हजारे आणि त्यांच्या पत्नी सौ. इंदुबाई शिवदास हजारे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले. या कार्यक्रमाला प्रा.राम शिंदे यांच्यासह करमाळा शहर व तालुक्यातील सर्वच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि व्यापारी क्षेत्रातील प्रतिष्ठितांची प्रमुख उपस्थिती राहिली.
उद्घाटनानंतर उपस्थितांनी विराज टेक्सटाइल मिलच्या या दालनात उपलब्ध असलेल्या कापड आणि साडी खरेदीचा मोह आवरला नाही. वस्त्र विश्वाचा १९९८ पासून अनुभव असलेले भाऊसाहेब औदुंबर खुने आणि बाळासाहेब औदुंबर खुने (दाजी) यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे मेहुणे दत्ता हजारे आणि सार्थक हजारे यांनी करमाळा परिसरातील ग्राहकांकरिता उपलब्ध केलेले उत्कृष्ट ब्रँडचे कापड आणि आकर्षक रंगसंगतीच्या साड्या बघता क्षणीच ग्राहकांना भुरळ पाडत असल्याचे यावेळी दिसून आले. उरळी कांचन येथील सुप्रसिद्ध विराज टेक्सटाईल मिलने थेट ग्राहकांसाठी सुरू केलेले हे दालन करमाळ्यातील दालन वस्त्र विश्वात नक्कीच नवा बदल घडवून आणणार असून “डायरेक्ट मिल ते ग्राहक” या संकल्पनेतून ग्राहकांना दर्जेदार साड्या व कपडे वाजवी दरात उपलब्ध करून देण्यात येणार असल्याने मोठ्या शहरांप्रमाणे किफायतशीर किंमतीत आणि ग्राहकांना हव्या असलेल्या नवीन ट्रेंडच्या बस्ता खरेदीचा आनंद आता करमाळा शहरात घेता येणार आहे. -प्रा. राम शिंदे, सभापती, विधानपरिषद, महाराष्ट्र राज्य. आमचे दाजी भाऊसाहेब औदुंबर खुने आणि बाळासाहेब औदुंबर खुने यांच्या पुढाकाराने विराज ग्रुप महाराष्ट्र च्या माध्यमातून राज्यभरात अशी दालने निर्माण करून ग्राहकांना कमीत कमी किमतीत जास्तीत जास्त समाधान देण्याचा आमचा प्रयत्न आहे. याचाच एक भाग म्हणून करमाळ्यातील हे झालं आम्ही सुरू केले आहे. -दत्ता हजारे, विराज टेक्सटाइल मिल, करमाळा.
.
.
.
.