करमाळा, प्रतिनिधी – शहरातील श्री गिरधरदास देवी प्रतिष्ठान संचलित नवभारत इंग्लिश मेडियम स्कूल व ट्विंकलिंग स्टार्स मध्ये दि.१ जुलै रोजी कृषी दिन, सीए दिन व डॉक्टर दिन साजरा उत्साहात साजरा करण्यात आला. हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांमध्ये शेती आणि शेतकऱ्यांविषयी कृतज्ञता निर्माण करण्यासाठी या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते.

कृषी दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना माती आणि शेतकऱ्यांच्या कष्टाची किंमत कळावी, या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना शेतीशी संबंधित असणाऱ्या अवजारांची माहिती देण्यात आली. यावेळी शाळेच्या सर्वेसर्वा सुनीता देवी ही उपस्थित होत्या. मुख्याध्यापिका अश्विनी क्षीरसागर यांनी विद्यार्थ्यांना कृषी दिना बद्दल माहिती सांगितली.

यासोबतच शाळेच्या नर्सरी, एलकेजी, युकेजीच्या विद्यार्थ्यांनी डॉक्टर दिनही साजरा केला. यानिमित्ताने विद्यार्थी डॉक्टर आणि नर्सच्या वेशात शाळेत आले. कॉरिडोर मध्ये उभारण्यात आलेल्या मिनी हॉस्पिटलमुळे त्यांना डॉक्टरांचे काम समजण्यास मदत झाली.

तसेच इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंतच्या वर्गांनी वृक्षारोपणाचा कार्यक्रमही पार पाडला. इयत्ता सहावी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये नुकतेच नामांतरण झालेल्या मदनदास देवी आयटीआय औद्योगिक शिक्षण संस्थेमध्ये विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल नेण्यात आली. राष्ट्र संघाचे अध्यक्ष आदरणीय मदनदास देवी सीए यांच्या जीवन प्रवासावर आधारित चित्र प्रदर्शन व त्यांच्या बद्दल माहिती दाखवण्यात आली तसेच आयटीआय कॉलेज मधील वर्कशॉपची ही माहिती यावेळी विद्यार्थ्यांना देण्यात आली.

.

.

.

.

.

