July 28, 2026
IMG-20260714-WA0059

करमाळा, प्रतिनिधी – तालुक्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम व स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने शिवसेना ओबीसीच्या वतीने जेऊर येथे गरजू व ‘लाडक्या बहिणींना’ 50 टक्के अनुदानात शिलाई मशीन वाटप करण्यात आले. शिवसेना पक्षप्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. सोलापूर ओबीसीचे जिल्हाप्रमुख राजकुमार हिवरकर-पाटील यांच्या विशेष सहकार्याने शिवसेना ओबीसीचे सोलापूर जिल्हाप्रमुख सुयश पुष्पा बाळासाहेब कर्चे यांच्या पुढाकारातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी महिलांचे आर्थिक सक्षमीकरण, स्वावलंबन आणि रोजगारनिर्मितीसाठी अशा उपक्रमांची आवश्यकता अधोरेखित केली. समाजातील गरजू महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी शिवसेना ओबीसीच्या माध्यमातून भविष्यातही विविध लोकहिताचे उपक्रम राबविण्यात येतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमास राजकुमार हिवरकर-पाटील (जिल्हाप्रमुख, सोलापूर ओबीसी), भीमराव भुसनर पाटील (ओबीसी प्रदेश प्रमुख, महासंघ), दादासाहेब लोखंडे (सोलापूर जिल्हा उपप्रमुख), तानाजी भोळे पाटील (माळशिरस), आकाश नाळे (शिवसैनिक), दिनेश खटके (संभाजी ब्रिगेड, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष) यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

तसेच निलेश पोटे, रमेश लगस, नागेश सातव, ज्योतीराम काळे, प्रदीप मिटे, राहुल जाधव, कुमार माने, आदिनाथ माने, माधव सूर्यवंशी यांच्यासह श्रीकृष्ण शिंदे टेलर, राहुल निमगिरे, प्रशांत गोडसे, मयूर मुटेकर, संकेत मुटेकर, अजित उपाध्य, सुहास शिंदे, नारायण कोंडलकर, संजय जगताप, दादासाहेब निमगिरे, योगेश निमगिरे, आजिनाथ निमगिरे, नितीन निमगिरे, करचे सर तसेच शिवसैनिक, पदाधिकारी, महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमानंतर महिलांनी या उपक्रमाबद्दल आयोजकांचे आभार मानत अशा समाजोपयोगी योजना सातत्याने राबविण्याची अपेक्षा व्यक्त केली.

महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी शिवसेनेकडून विविध कल्याणकारी योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरू राहील. आगामी काळात प्रत्येक तालुक्यातील गावांमध्ये शिलाई मशीनसह विविध समाजहिताच्या योजनांचा लाभ अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.
-सुयश कर्चे जिल्हाप्रमुख, शिवसेना ओबीसी सेल.

.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!