पुढील शिक्षणाची सोय नसल्याने करमाळा शहर व तालुक्यातून अनेक विद्यार्थी सोय असलेल्या ठिकाणी उच्च शिक्षण घेऊन त्या त्या क्षेत्रात पारंगत होतात आणि मोठ्या शहरात कुठेतरी नोकरी किंवा स्वतःचा व्यवसाय थाटून स्थाईक होतात. हा शहर व तालुक्याचा मागील अनेक वर्षांपूर्वीचा अनुभव आहे. मात्र अलीकडील काळातील तरुण पिढी करमाळा शहरात किंवा तालुक्यात सेवा देण्याच्या हेतूने मातृभूमीतच राहून हा पायंडा मोडून काढण्याचा प्रयत्न करत आहे.

साधारणतः दहा वर्षांपूर्वी पर्यंत वेगवेगळे आजार किंवा अपघातांवरील उपचारासाठी करमाळा शहर व तालुक्यातील रुग्णांना बार्शी, सोलापूर, अहिल्यानगर किंवा पुणे गाठावे लागत असे. दुसऱ्या शहरात उपचार म्हणजे राहण्याच्या सोयीसह इतर समस्यांना तोंड द्यावे लागते. ही बाब लक्षात घेऊन विविध ठिकाणी उच्च शिक्षण घेऊन आपापल्या क्षेत्रात पारंगत झालेल्या अलीकडील पिढीतील काही जणांनी करमाळा शहरातच वैद्यकीय सेवा देण्याचा संकल्प केला आहे.

पूर्वी करमाळा शहर व तालुक्यातील रुग्णांना कान, नाक व घसा संबंधी आजारांवरील उपचारासाठी बाहेर जावे लागत असे. परंतु दिवंगत जेष्ठ विधिज्ञ ॲड. नानासाहेब (आबा) घाडगे यांचे सुपुत्र आणि करमाळा शहरातील एकमेव कान, नाक, घसा तज्ञ डॉ. अमोल नानासाहेब घाडगे यांनी सुद्धा मातृभूमीतच सेवा देण्याचा संकल्प करून गेल्या १२ वर्षांपासून वरद हॉस्पिटलच्या माध्यमातून करमाळा शहर व तालुक्यासह राज्यातील व परराज्यातील अनेक रुग्णांवर करमाळ्यातच माफक फी मध्ये यशस्वी उपचार केले आहेत.

वैद्यकीय व्यवसाय सुरू असला तरी शांत, संयमी आणि समाजप्रिय स्वभावामुळेही ते सुपरिचित असून याच स्वभाव गुणांच्या आधारे त्यांनी तालुक्यातील तरटगाव ग्रामपंचायतीचे सरपंचपद भुषविले आहे. याबरोबरच करमाळा तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशनचे ते २ वर्षे अध्यक्ष राहीलेले असून तालुक्यातील श्री आदीनाथ सहकारी साखर कारखान्याचे ते विद्यमान संचालक आहेत. याशिवाय त्यांचे पिताश्री ॲड. स्व. नानासाहेब (आबा) यांच्या जयंतीनिमित्त गेल्या ५ वर्षांपासून वरद हॉस्पिटलच्या माध्यमातून होणाऱ्या मोफत सर्व रोग निदान शिबीरात पुणे, मुंबई, बार्शी, अहिल्यानगर आदी ठिकाणच्या निष्णात डॉक्टरांचा सहभागातून तालुक्यातील हजारो रुग्णांना अल्पदरात उपचार मिळवून देत सेवाभाव जपत आहेत. या सेवाभावी वृत्तीला डॉ. अमोल यांच्या अर्धांगिनी आणि दंतरोग तज्ञ डॉ. स्वाती यांचीही तेवढीच साथ आहे.

आपल्या वैद्यकीय पेशाला व्यवसाय न मानता सेवा मानून प्रामाणिकपणे काम करत डॉ. अमोल आणि डॉ. स्वाती यांनी शहरातील मंगळवार पेठ येथे उभारलेल्या वरद हॉस्पिटलमध्ये अद्ययावत वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करून शहर व तालुक्यातील रुग्णांना इतर शहरांत उपचारासाठी जाण्याची गरजच ठेवलेली नाही.

असा सेवाभाव जपणाऱ्या आणि कान, नाक व घसा संबंधी आजारांवर मातृभूमीतच सेवा देणाऱ्या डॉ. अमोल नानासाहेब घाडगे यांचा आज वाढदिवस…!!! असाच सेवाभाव जपत त्यांचे समाजकार्य उत्तरोत्तर वाढत राहो, हीच
त्यांच्या वाढदिवसानिमित्त सदीच्छा…🌹🌹🌹🌹🌹!!!

.

.

