करमाळा बाजार समितीच्या संचालकपदी हनुमंत चांदणे यांची निवड
करमाळा, प्रतिनिधी – देशभक्त कै. नामदेवराव जगताप व कर्मवीर कै. आण्णासाहेब जगताप यांच्यापासून सर्वसामान्यांतील कर्तृत्ववान कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या संधी देण्याची जगताप गटाचे संस्कार व परंपरा असल्याचे प्रतिपादन मा.आ. जयवंतराव जगताप यांनी केले आहे. जगताप गटाचे निष्ठावंत कार्यकर्ते हनुमंत चांदणे यांची कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे . यानिमित्त आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते.

यावेळी पुढे बोलताना मा.आ. जगताप यांनी सांगितले की, नेता बनन्यापेक्षा जनतेचे पाईक, दास व सेवक बनून सर्वसामान्यांची सेवा करण्याचे जगताप घराण्याचे संस्कार आहेत. ही परंपरा कायम राखत करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रिक्त असलेल्या ग्रामपंचायत अनुसूचित जाती-जमाती या जागेवर वीट येथील जगताप समर्थक हनुमंत चांदणे यांची संचालकपदी निवड करण्यात आली आहे.

मा. आ. जयवंतराव जगताप यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाने हनुमंत चांदणे यांची बिनविरोध निवड करण्याचा ठराव बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या सभेत मंजूर झाला. चांदणे यांच्या निवडीस जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांनी अधिसूचनेद्वारे प्रसिद्धी दिली आहे.

यानंतर शुक्रवार दि.१७ रोजी बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या सभेत माजी आमदार जगताप यांनी नूतन संचालक चांदणे यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या. निष्ठावंत कार्यकर्त्याच्या निष्ठेची कदर केल्यामुळे व वीट गावाला बाजार समितीमध्ये प्रतिनिधीत्व करण्याची संधी दिल्यामुळे वीट ग्रामस्थांनी माजी आमदार जगताप यांचे आभार मानले आहेत.

यावेळी बोलताना चांदणे यांनी माजी आमदार जगताप यांचे कृतज्ञतापूर्वक आभार मानत दलित समाजाच्या कार्यकर्त्याला तालुका पातळीवर शेतकऱ्यांची सेवा करण्याची संधी देऊन टाकलेल्या विश्वासास पात्र राहून काम करण्याची ग्वाही दिली. यावेळी माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष शंभूराजे जगताप, पंचायत समितीचे उपसभापती ॲड. अजित विघ्ने, भाजपा जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे, आदीनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक नवनाथ झोळ, जेष्ठ कार्यकर्ते देविदास ढेरे, वीट गावचे सरपंच महेश गणगे, बोरगावचे सरपंच विनय ननवरे यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी प्रशांत पाटील, माजी नगराध्यक्ष प्रशांत ढाळे, बाजार समितीच्या उपसभापती सौ.शैलजा मेहेर, रामदास गुंडगिरे, सागर दौंड, सौ. मनीषा देवकर, जनार्दन नलवडे, मधूकर गाडे, तात्यासाहेब शिंदे, महादेव कामटे, शिवाजी राखुंडे, नागनाथ लकडे, काशिनाथ काकडे, कुलदीप पाटील, मनोज पितळे, परेशकुमार दोशी, वालचंद रोडगे,

माजी उपनगराध्यक्ष नारायणबापू जगताप, खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष महादेव डुबल, संचालक शहाजी शिंगटे, दादासाहेब लबडे, हनुमंत ढेरे, अनिल चोपडे, भगवान गिरी, तात्यासो जाधव, अशोक राऊत, पप्पू चोपडे, राजेंद्र गाडे, रविंद्र ढेरे, दादासाहेब कोकरे, वैजीनाथ कदम, दिलीप ढेरे, आनंदकुमार ढेरे, बाळासाहेब ढेरे, शिवराज जगताप, नगरसेवक युवराज चिवटे, सचिन अब्दुले, अहमद कुरेशी, चेतन आलाट, विक्रांत मंडलेचा, विलास जाधव, गणेश ढेरे, रविंद्र वळेकर, विनय ननवरे, अजित पाटील, दिपक भोज, नसरुल्ला खान, मुख्याध्यापक सुनिल शिंदे, विठ्ठल रोडगे, किरण भागडे यांच्यासह वीट ग्रामस्थ, व्यापारी, शेतकरी व तालुक्यातून सर्व स्तरातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. प्रा दत्तात्रय भागडे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर उपसभापती बबनराव मेहेर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

.

.

.

