करमाळा, प्रतिनिधी – बिटरगाव येथे गुरुपौर्णिमा उत्सव आणि ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार (भाऊ) गोरे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य महाआरोग्य शिबिर उत्साहात पार पडले. भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष दिगंबर राखुंडे यांच्या पुढाकारातून आयोजित शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

करमाळा तालुका आरोग्य विभागाच्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी ६५० नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करून औषधे व आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. तसेच जनावरांचे लसीकरण व पशुधनासाठी मोफत औषधांचे वाटप करण्यात आले. यानिमित्ताने आयोजित रक्तदान शिबिरात १६४ महिला-पुरुषांनी स्वेच्छेने रक्तदान केले. हे शिबिर श्री कमला भवानी ब्लड बँकेच्या सहकार्याने पार पडले. आयोजकांच्या वतीने सर्व रक्तदात्यांचा भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.

आरोग्य सेवा, रक्तदान जनजागृती आणि पशुधन आरोग्य संवर्धनाचा संगम घडविणारा हा उपक्रम यशस्वी ठरल्याबद्दल आयोजक दिगंबर राखुंडे, आरोग्य विभाग, श्री कमला भवानी ब्लड बँक, स्वयंसेवक आणि ग्रामस्थांचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले.

.

.

.

.

.

.

.

.

