March 1, 2026
IMG-20251115-WA0053

करमाळा तालुक्यातील हृदयद्रावक घटना…!!!

करमाळा, प्रतिनिधी – आयुष्यभर एकमेकांच्या मागे सावलीसारखे उभे असलेल्या पती-पत्नीने केवळ काही मिनिटांच्या फरकाने इहलोकीची यात्रा पूर्ण केली आहे. करमाळा तालुक्यातील मिरगव्हाण येथे ही हृदयद्रावक घटना घडली आहे.

मिरगव्हाण येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील तब्बल १०५ वर्षे वय असलेले दगडू शंकर हाके यांचे शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास वार्धक्याने निधन झाले. पती दगडू यांचे निधन झाल्याचे लक्षात येताच त्यांच्या ९५ वर्षीय अर्धांगिनी केशरबाई दगडू हाके यांनीही पती पाठोपाठ जीव सोडला. शंभरी पार दगडू आजोबा आणि शंभरी गाठलेल्या केशर आजी यांच्या एकापाठोपाठ जाण्याने संपूर्ण गाव हळहळला.

शनिवारी दुपारी चार वाजता मिरगव्हाण येथील लावंड वस्ती येथील हाके यांच्या शेतात या दोघांवरही एकत्रितपणे अंत्यसंस्कार करण्यात आले. हाके दांपत्याच्या पाठीमागे दोन मुले, एक मुलगी, नातवंडे, पंतवंडे असा मोठा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *