मुस्लिम समाजाच्या अडीअडचणी घेतल्या समजावून
करमाळा, प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्याचे वक्फ महामंडळाचे अध्यक्ष समीर गुलाबनबी काझी यांनी आज करमाळा येथे भेट देऊन मुस्लिम समाजाच्या अडीअडचणी समजावून घेतल्या यावेळी सकल मुस्लिम समाजाचे मार्गदर्शक तसेच रहिनुमा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष कलीम काझी यांनी त्यांचा यथोचित सत्कार केला

महाराष्ट्र राज्य काजी संघटनेचे अध्यक्ष कलीम काझी (सर) यांच्या निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमात व्यासपीठावर काझी संघटनेचे प्रांतिक अध्यक्ष शफिक काझी, जमियतुल उलेमा संघटनेचे राज्य अध्यक्ष मौलाना हाफिज जाकीर सिद्दिकी, हुसेन सगरी, मौलाना रफिक तसेच मौलाना मुफ्ती रेहान तसेच सर्व मशिदीचे धर्मगुरू उपस्थित होते. यावेळी राज्य व महामंडळाचे अध्यक्ष समीर काजी यांनी मुस्लिम समाजाच्या व संबंधित ज्या काही अडीअडचणी असतील त्या सोडवण्या कामी मी सदैव प्रयत्न करीन असे श्री काझी बोलताना म्हणाले. यावेळी त्यांचा सत्कार सकल मुस्लिम समाज बांधवांचे कार्यकर्ते तसेच रहिनुमा चारीटेबल ट्रस्टचे सर्व पदाधिकारी यांनी केला. यावेळी मुस्लिम बांधव यांनी आपले अडीअडचणी सांगितल्या त्यावर काजी साहेबांनी अडचणी सोडविण्याकामी प्रयत्नशील राहू, असे ते म्हणाले.

यावेळी करमाळा तालुक्यातील करमाळा शहर तसेच उमरड, वडगाव, पुनवर, देवळाली, जेऊर, कंदर, सावडी राजुरी, वाशिंबे या भागातील बहुसंख्य मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी करमाळा तालुक्यातील शेलगाव वांगी येथील मशिदीची नोंद लावण्यात यावी याशिवाय तालुक्यातील दफन भूमीचा प्रश्न निकाली काढण्यात यावा, मशिदीसाठी पोर्टल वरून नोंद घेण्यात यावी या आणि अशा विविध मागण्या यावेळी महाराष्ट्र राज्य वक्फ महामंडळाचे अध्यक्ष समीर काजी यांच्याकडे करण्यात आल्या. महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्ड चेअरमन समीर काझी साहेब व काझी सेवा संघ चे अध्यक्ष जनाब शफी काझी साहेब यांनी करमाळा दौऱ्यावर प्रथम हाजी कलीम काझी सर ( मार्गदर्शक- सकल मुस्लिम समाज- करमाळा शहर व तालुका)याच्या निवासस्थानी भेट दिली व मार्गदर्शन केले.

या वेळी मौलाना फारुक रजा, जमीर सय्यद, एडवोकेट अलीम पठाण एडवोकेट नईम काजी, आझादभाई शेख, मुस्तकीम पठाण, हाजी सादीक काझी,सुरज शेख पैलवान इम्तियाज पठाण, आयुब शेख सोहेल पठाण व मुस्लीम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदरचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडणे कामी सकल मुस्लिम समाज बांधव जमीर सय्यद अध्यक्ष सकल मुस्लीम समाज, ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे तालुका अध्यक्ष एडवोकेट नईम काझी, एडवोकेट आलिम पठाण राष्ट्रवादी चे उपाध्यक्ष आझाद शेख, रहनुमा चॅरिटेबल ट्रस्टचे उपाध्यक्ष पैलवान इम्तियाज पठाण,सूरज शेख मुस्तकीम पठाण,इकबाल शेख राष्ट्रवादीचे अध्यक्ष सोहेल पठाण, पिंटू बेग, फिरोज बेग, अरबाज बॅग मौलाना फारूक रजा, मुफ्ती अबू रेहान, मौलाना रफिक, सुलतान पठाण केम, युनूस पठाण उमरड मुस्लिम जमात आयुब सय्यद जेऊर, चांद शेख पठाण, युनूस मुजावर, शाहरुख नालबंद, सुफरान शेख,खलील कुरेशी, गुलामगौस कुरेशी, अकबर राज, जीशान कबीर, गुलाम सय्यद अमीर शेख, राजू खान, अरबाज सय्यद आवाटी आदि मुस्लिम बांधव कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

