September 3, 2026
IMG-20260820-WA0058

करमाळा, प्रतिनिधी – करमाळा बसस्थानक परिसरातील गर्दीचा फायदा घेत महिलेच्या हँडपर्समधून सुमारे ₹10 लाख 4 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीस नेल्याप्रकरणी करमाळा पोलिसांनी एका महिलेला अटक करून चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तसेच दुसऱ्या स्वतंत्र कारवाईत चोरीस गेलेली मोटारसायकलही जप्त करून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

याबाबत पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी सांगितले की, दि. 30 एप्रिल 2026 रोजी करमाळा ते सोलापूर बसने प्रवास करणाऱ्या धनंजय पुजारी यांच्या पत्नीच्या पर्समधून सोन्याचे दागिने चोरीस गेले होते. यामध्ये 25 ग्रॅम सोन्याचा राणी हार, 27 ग्रॅम सोन्याचे मोठे घुंगरू, 10 ग्रॅम सोन्याचा चोकर आणि 5 ग्रॅम वजनाचे कानातील झुबे टॉप असा मुद्देमाल होता. पोलिसांच्या तपासात साधना जैना काळे (वय 27, रा. बिडकीन, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर) हिचा सहभाग निष्पन्न झाला. तिच्याकडून संपूर्ण सोन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तिला अटक करण्यात आली आहे.

याबरोबरच दि. 4 ऑगस्ट 2026 रोजी कसाब गल्ली, करमाळा येथून चोरीस गेलेल्या सुमारे ₹65 हजार किमतीच्या हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकलचा करमाळा पोलिसांनी तपास करून आरोपी रावसाहेब ऊर्फ पप्पू पांडुरंग चव्हाण (रा. सावडी, ता. करमाळा) याला अटक केली. त्याच्याकडून चोरीची मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कवाडे व उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा व्ही.एस. यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजीत माने व त्यांच्या पथकाने केली.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!