May 6, 2026
IMG-20260420-WA0033

डॉ. रेणुका महाजन देणार मावा किडीच्या जैविक व्यवस्थापनावर माहिती

पुणे, प्रतिनिधी – शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरणाऱ्या मावा किडीच्या जैविक व्यवस्थापनावर पुणे कृषी महाविद्यालयाच्या किटकशास्त्र विभागाच्या सहा. प्राध्यापिका डॉ. रेणुका सुनील महाजन या सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत. डॉ. रेणुका महाजन या करमाळा शहरातील दत्तपेठ येथील महाजन कुटुंबातील कन्या असून आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आज सायंकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी प्रसारित होणाऱ्या ‘माझं घर माझं शेत’ या कार्यक्रमाद्वारे त्या शेतकऱ्यांसाठी उपयुक्त माहिती देणार आहेत.

मावा म्हणजे ऊस, ज्वारी, कापूस, करडई आदी पिकांवर आढळणारी एक कीड आहे. या कीडीमुळे पिकांमध्ये चिकटा हा रोग होऊन इतर पिकांवरही याचा प्रादुर्भाव होतो. या किडीचे नियंत्रण शेतकऱ्यांसाठी नेहमीच डोकेदुखी ठरलेली आहे. आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आज प्रसारित होणाऱ्या ‘माझं घर माझं शेत’ या कार्यक्रमात डॉ. रेणुका महाजन या ‘ॲफिडीयस कोलेमानी’ या मित्र किटकाच्या सहाय्याने मावा किड नियंत्रणाची प्रभावी पद्धत समजावून सांगणार आहेत.

धिरज केदारी यांनी या कार्यक्रमाचे सादरीकरण केले असून निर्मिती सहाय्य प्रिया बेल्हेकर यांचे आहे. शेतातील किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आकाशवाणी पुणे केंद्र आज सोमवार दि. २० रोजी सायंकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी प्रसारित होणारा हा उपयुक्त कार्यक्रम शेतकऱ्यांनी ऐकावा, असे आवाहन आकाशवाणीच्या पुणे केंद्राकडून करण्यात आलेले आहे.

रेडिओसह Newsonair या मोबाईल अ‍ॅपद्वारे लाईव्ह स्ट्रीमिंगवरही कार्यक्रम ऐकण्याची सुविधा उपलब्ध आहे.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!