September 5, 2026
IMG-20260811-WA0045(1)

तर्क-वितर्कांना उधाण; अधिकृत माहितीची प्रतीक्षा

करमाळा, प्रतिनिधी – मंगळवारी सकाळीच समाज माध्यमांवर फिरणाऱ्या एका मेसेजने करमाळा तालुक्यात खळबळ उडवून दिली आहे. या मेसेज मध्ये केवळ ‘धाड पडली’ असा उल्लेख असल्याने राजकीय क्षेत्रासह करमाळा तालुक्यातील माध्यम विश्वात ही खळबळ उडाली आहे.

या मेसेज मध्ये ‘रेड’ या शब्दाचा उल्लेख असल्याने रेड किंवा धाड नेमकी कुठे पडली असेल याचा तर्कवितर्क लावण्यात दुपार झाली असली तरी दुपारनंतर मात्र तालुक्याशी संबंधित असलेल्या एका राजकीय व्यक्तीवर किंवा संस्थेवर ही धाड पडल्याचे अधिकृतपणे सांगितले जात आहे. दुपारनंतर ऐकिवात आलेल्या चर्चांनुसार समाज माध्यमांवर ‘सत्तेत असून आपलेच लोक पाठीत खंजीर खुपसत आहेत’ अशा आशयाच्या मेसेजमुळे सदर व्यक्ती किंवा संस्था राजकीय क्षेत्राशी संबंधित असल्याचा अंदाज करत ‘धाड’ या शब्दाशी संबंधित असणाऱ्या काळ्या आणि गोऱ्या व्यवसायाशी संबंधित असलेल्या प्रतिनिधींकडे चाचणी करण्यात आली. मात्र या व्यवसायांशी संबंधित व्यक्ती या प्रकरणात नसल्याचेच निदर्शनास आले.

यानंतर दुपारी एकच्या दरम्यान काही पत्रकारांनीही पोलीस प्रशासनाकडून याबाबतचा कानोसा घेण्याचाही प्रयत्न केला. दरम्यान करमाळा येथे भोंदूगिरी आणि इतर प्रकरणाबाबत गुन्हा दाखल असलेल्या बाबाशी असलेल्या आर्थिक संबंधांमुळे सदर नेत्याची उपविभागीय पोलीस कार्यालयामार्फत चौकशी असल्याची माहिती मिळाली.

याशिवाय शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित असलेल्या या व्यक्तीचा पेपर किती प्रकारची ही संबंध असल्याचे बोलले जात आहे. या बातमीतील सर्व माहिती केवळ चर्चा आणि तर्क वितर्कांतून मांडलेली नसून वरील सर्व माहितीला कोणताही अधिकृत दुजरा अद्याप मिळालेला नसला तरी याबाबतची माहिती घेण्याचे काम सुरू असून याबाबत लवकरच अधिकृतपणे सर्व माहिती देण्याचा प्रयत्न तेज वार्ता च्या माध्यमातून केला जाईल.

.

.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!