September 5, 2026
IMG-20260813-WA0023

करमाळा, प्रतिनिधी – ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर मोठी शैक्षणिक भरारी घेण्याची क्षमता असल्याचे ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील आयुष मोटे आणि यश लांडगे या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. Engineering प्रवेश प्रक्रियेत उल्लेखनीय यश मिळवत दोन्ही विद्यार्थ्यांनी पुण्यातील प्रतिष्ठित COEP Technological University (College of Engineering, Pune) येथे Engineering अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवला आहे.

ग्रामीण भागातून शिक्षण घेत COEPसारख्या नामांकित संस्थेत प्रवेश मिळवणे ही करमाळा तालुक्यासाठी तसेच ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट परिवारासाठी अभिमानाची बाब आहे. या यशामुळे संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्तेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले असून, ग्रामीण विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण व योग्य मार्गदर्शन मिळाल्यास ते राष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांमध्ये स्थान मिळवू शकतात, हे स्पष्ट झाले आहे.

आयुष मोटे व यश लांडगे यांच्या यशामागे पालकांचे मार्गदर्शन, शिक्षकांचे मार्गदर्शन, संस्थेचे संस्थापक प्रा. डॉ. निकत सर यांचे योग्य शैक्षणिक नियोजन तसेच विद्यार्थ्यांची मेहनत, सातत्य आणि जिद्द यांचा मोलाचा वाटा आहे.

गावाकडून COEPपर्यंतचा दोन्ही विद्यार्थ्यांचा हा प्रेरणादायी प्रवास करमाळा तालुक्यातील आणि ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना निश्चितच प्रेरणा देणारा ठरणार आहे.

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा परिवाराच्या वतीने आयुष मोटे व यश लांडगे यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल शैक्षणिक भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!