करमाळा, प्रतिनिधी – शहरातील वेताळ पेठ येथील रहिवासी चंद्रकांत (बाबा) रामभाऊ जवकर (वय-८७ वर्षे) यांचे मंगळवारी सकाळी साडेसहा वाजता वृद्धापकाळाने राहत्या घरी दुःखद निधन झाले.
चंद्रकांत (बाबा) जवकर हे मितभाषी आणि शिस्तबद्ध जीवनशैलीमुळे शहरात सुपरीचीत होते. त्यांचे कुटुंब प्रदीर्घकाळ राशिन पेठ येथे राहण्यास असल्याने राशिन पेठ येथे वर्षभर होणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग होता. सध्या ते शहरातील वेताळ पेठ येथे वास्तव्यास होते.
त्यांच्यावर मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजता शहरातील अहिल्यानगर रस्त्यावरील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध स्तरातील नागरीक उपस्थित होते. त्यांच्या पाठीमागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. यांच्या निधनानंतर राशीन पेठ तरुण सेवा मंडळाकडून श्रद्धांजली वाहण्यात आली.
