October 29, 2026
IMG-20261029-WA0104

करमाळा, प्रतिनिधी – पुणे पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या हर्षदा देशमुख-जाधव यांना पहिल्या पसंतीची भरघोस मध्ये मिळून त्या विजयी झाल्यानंतर करमाळ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने त्यांच्या विजयाचा आनंदोत्सव फटाके फोडून आणि पेढे वाटून करण्यात आला.

बुधवारी सायंकाळी शहरातील सुभाष चौक येथे हा जल्लोष करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस संतोष वारे, तालुकाध्यक्ष अमरजीत साळुंखे आणि डॉ. अमोल घाडगे यांनी प्रचंड चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत बॅलेट पेपरचा वापर झाल्याने सत्याचा विजय झाल्याची तसेच रोजगाराच्या फुसक्या आशा देऊन युवा पिढीला बेरोजगार ठेवलेल्या जेन जी च्या उद्रेकाचा प्रत्यय असल्याची भावना व्यक्त केली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष शिवाजी जाधव, राष्ट्रवादी विद्यार्थी परिषदेचे शहराध्यक्ष ऋषिकेश शिगची, विद्यार्थी-युवक तालुका अध्यक्ष अरशान पठाण, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश कांबळे, रोहित दादा फाउंडेशनचे मुस्तकीन पठाण, डॉ अमोल घाडगे, समाधान शिंगटे, अरुण टांगडे, अमोल जाधव, राहुल जाधव, ॲड. प्रशांत बागल, केतन इंदुरे, राजेंद्र पवार, अशपाक जमादार, दिलीप चव्हाण यांच्यासह राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!