July 28, 2026
IMG-20260616-WA0058(1)

शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांची घरपट्टी स्वतः भरून शिक्षणाला प्रोत्साहन

करमाळा, प्रतिनिधी – विद्यार्थी संख्येअभावी अनेक जिल्हा परिषद शाळा डबघाईला येत आहेत. ही परिस्थिती बदलण्यासाठी करमाळा तालुक्यातील मांगी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा ग्रामपंचायत सदस्य सुजित (तात्या) बागल यांनी गेल्या वर्षी पासून आपल्या पाल्याचा प्रवेश मांगी जिल्हा परिषद शाळेत घेणाऱ्या पालकांची घरपट्टी स्वतः ग्रामपंचायत मध्ये भरत आहेत.

गेल्या काही वर्षांपासून विद्यार्थी संख्येअभावी अनेक जिल्हा परिषद शाळा डबघाईला येत आहेत. ही परिस्थिती बदलण्यासाठी सुजित बागल यांनी पुढाकार घेतला आहे. मागील वर्षी मांगी जिल्हा परिषद शाळेत आपल्या पाल्यांचा प्रवेश घेणाऱ्या २० पालकांची घरपट्टी त्यांनी स्वतः ग्रामपंचायतीमध्ये भरली होती. तसेच गावासह पंचक्रोशीतील पालकांना आपल्या मुला-मुलींना जिल्हा परिषद शाळेत दाखल करण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या या उपक्रमाला पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत यंदाही जवळपास १८ पालकांनी आपल्या मुला-मुलींचा प्रवेश मांगी जिल्हा परिषद शाळेत घेतला आहे. या सर्व १८ पालकांसह पाल्याचा नव्याने प्रवेश घेणाऱ्या पालकांचीही घरपट्टी स्वतः भरणार असल्याची घोषणा बागल यांनी केली आहे.

यावेळी मांगी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत वीर, शाळेच्या शिक्षिका वैशाली शेटे, सुनिता काळे, आशा देमुंडे यांच्यासह निखिल बागल, आण्णासाहेब बागल आदीजण उपस्थित होते.

.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!