September 11, 2026
IMG-20260909-WA0041

करमाळा, प्रतिनिधी – शहरातील प्रमुख गणेश मंडळांपैकी असलेल्या सरकार मित्र मंडळाची वार्षिक बैठक खेळीमेळीत संपन्न झाली. यावेळी गणेशोत्सव 2026 च्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून शहरातील सुतार गल्ली येथील विश्वजीत उर्फ छोटू देवीसिंग परदेशी यांची मंडळाच्या अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली.

सरकार मित्र मंडळाचे यंदाचे २१ वे वर्ष असून स्थापनेपासूनच या मंडळात शहराच्या विविध भागासह तालुक्याच्या ग्रामीण भागातील तरुणांचा सहभाग राहिला आहे. अठरापगड जातीच्या सदस्यांच्या समावेश असलेल्या या गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची दरवर्षी नव्याने निवड केली जाते. या गणेश मंडळात श्रींच्या स्थापनेपासून विसर्जनापर्यंत दररोज पहाटे अथर्वशीर्ष पठणाचा धार्मिक उपक्रम राबविला जातो. या उपक्रमात शहरातील महिला वर्गाचा मोठ्या संख्येने सहभाग असतो. सहभागी महिलांना लकी ड्रॉ द्वारे आकर्षक भेट वस्तूंसह पाठादरम्यान चहा आणि मसाला दुधाचे वाटप करण्यात येते. याशिवाय सरकार मित्रमंडळातर्फे गणेशोत्सवात विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. हे सर्व उपक्रम पार पाडण्यासाठी विश्वजीत परदेशी यांचा मोठा सहभाग असतो. यांच्या या कार्याची दखल घेत अध्यक्षपदासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे.

यावेळी सरकार मित्रमंडळाच्या उपाध्यक्षपदी माऊली कदम, मिरवणूक प्रमुखपदी भुषण खुळे तर कार्याध्यक्षपदी दिनेश ममदापूरे यांची निवड करण्यात आली आहे. या बैठकीला मंडळाचे सदस्य विजय घोलप, विशाल राठोड, सचिन घोलप, ज्योतीराम लावंड, सचिन गायकवाड, सुहास माने, अरुणकाका जगताप, सुरज वांगडे, उमेश गोडसे, अमोल यादव यांच्यासह सर्व आजी-माजी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

सरकार मित्र मंडळाच्या अध्यक्षपदी तसेच इतर पदांवर निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!