एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांतून समाधान
करमाळा, प्रतिनिधी – केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांच्या ६९ व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्य रणनीती फाउंडेशनच्या वतीने करमाळ्यात बुधवारी फळे वाटप करण्यात आले. भाजपा शहराध्यक्ष जगदीश आगरवाल यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

देशांतर्गत दळणवळणासाठी रस्ते व महामार्ग हे रक्तवाहिनीची भूमिका बजावतात. भाजपा सत्तेत आल्यानंतर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रीपदाची सूत्रे यशस्वीरित्या हाताळत ना. गडकरी यांनी देशभरातील रस्त्यांसह महामार्गांचे जाळे अद्ययावत पद्धतीने विकसित केले आहे. यामुळे देशांतर्गत जड वाहतूक सुकर झाली असून यामुळे वाहनचालकांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून येते.

या समाधानाची पोच पावती म्हणून ना. गडकरी यांच्या ६९ व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्य रणनिती फाउंडेशनच्या वतीने करमाळ्यातील बाह्यवळण रस्त्यावरील ओम साई वर्कशॉप समोर सोलापूर-अहिल्यानगर मार्गावर प्रवास करणाऱ्या दुचाकी, चार चाकी वाहनांसह अवजड वाहनांना थांबवून फाउंडेशनचे करमाळा तालुका अध्यक्ष ॲड. प्रियाल आगरवाल आणि इतर पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात फळ वाटप केले. बुधवारी एकादशीचा दिवस असल्याने मराठवाडा विदर्भ भागातून टेंभुर्णी मार्गे पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांनाही या उपक्रमाचा लाभ घडला.

.

.

.

.

