June 10, 2026
IMG-20260118-WA0018(1)

तीन दिवसांची पोलीस कोठडी

करमाळा, प्रतिनिधी – शहर व परिसरात अवैध धंद्यां विरुद्ध पोलिसांनी कंबर कसली आहे. गावठी दारू, बनावट दारू, पत्त्यांचा जुगार, कॉम्प्युटर वरील चक्री जुगार, प्रतिबंधित इंजेक्शन्स आदी कारवाया सुरू असतानाच करमाळा पोलिसांनी शनिवारी रात्री १० किलो गांजा बाळगणाऱ्यास पकडले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहराच्या बायपास परिसरात एकजण मोठ्या प्रमाणात गांजा बाळगून असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून करमाळा पोलिसांना शनिवारी रात्री अकराच्या सुमारास एका स्कुटी क्र.एम एच ४५ ए ए ८४२२ वर एक व्यक्ती संशयित रीत्या आढळून आला. त्याची चौकशी करण्याचा प्रयत्न केला असता त्याने पळ काढला. मात्र पोलिसांनी त्याचा पाठलाग करून बायपास चौकाजवळ त्याला घेरले असता त्याने त्याचे नाव गौरव उर्फ फंट्या दिलीप दोशी (वय-४२ वर्षे, रा. गुजर गल्ली, करमाळा) असे सांगितले. अधिक चौकशी केली असता त्याच्याकडे २,५६,२०० रु. किमतीचा तब्बल दहा किलो गांजा आढळून आला. या कारवाईत पोलिसांनी त्याला ताब्यात घेत स्कुटीसह एकूण ३,०६,२०० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.

गौरव उर्फ फंट्या दिलीप दोशी याला रविवारी करमाळा न्यायालयात उभे केले असता त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक रणजीत माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप बनकर, पो.ह. अर्जुन गोसावी, अमोल रंदील, सोमनाथ गावडे यांनी ही कारवाई केली आहे.

.

.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!