June 10, 2026
IMG-20260610-WA0005

नियमभंग करणाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार

करमाळा, प्रतिनिधी – श्री कमलादेवी मंदिर व परिसरातील पवित्रता, शांतता आणि धार्मिक वातावरण अबाधित राखण्यासाठी मंदिर ट्रस्टने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मंदिर परिसरात कोणत्याही प्रकारचे धार्मिक किंवा भावनिक रील्स (Reels), फोटो अथवा व्हिडिओ बनविण्यास सक्त मनाई करण्यात आली असून याबाबतचा इशारा देणारा फलक मंदिर परिसरात लावण्यात आला आहे.

फलकावरील माहितीनुसार, मंदिराची पवित्रता व शांतता भंग करणारे चित्रीकरण आढळून आल्यास संबंधित व्यक्तींचे मोबाईल व कॅमेरे तात्काळ जप्त करण्यात येतील. तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 298 व 299 अन्वये धार्मिक भावना दुखावणे आणि पवित्रता भंग केल्याप्रकरणी थेट गुन्हा (FIR) दाखल करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
याशिवाय महाराष्ट्र पोलीस कायद्यातील कलम 110 व 112 अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन करून शांतता भंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई तसेच अटकेचीही तरतूद असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

मंदिर परिसरात येणाऱ्या भाविकांनी नियमांचे पालन करून धार्मिक स्थळाची प्रतिष्ठा व शांतता जपावी, असे आवाहन श्री जगदंबा कमलादेवी मंदिर ट्रस्ट यांच्या वतीने करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागेल, असा इशाराही ट्रस्टने दिला आहे.

.

.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!