June 12, 2026
IMG-20260612-WA0008

करमाळा, प्रतिनिधी – टी-20 क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडियातर्फे आयोजित करण्यात आलेल्या गोवा सीएमसी ट्रॉफी टी-20 क्रिकेट चॅम्पियनशिप 2026 साठीच्या ऑल इंडिया टीम सिलेक्शन ट्रायल्समध्ये नवभारत इंग्लिश मीडियम स्कूलच्या इयत्ता सातवीतील विद्यार्थी रुद्र परदेशी याची निवड झाली आहे.

ही निवड चाचणी दि. 6 जून 2026 रोजी गरवारे स्टेडियम (कलाग्राम, छत्रपती संभाजीनगर) येथे पार पडली. देशभरातील अनेक होतकरू खेळाडूंनी या निवड प्रक्रियेत सहभाग घेतला होता. यामध्ये रुद्र परदेशी याने फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा तिन्ही विभागांत अष्टपैलू कामगिरी करत निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले.

या टीममधून निवड झालेल्या अव्वल खेळाडूंना आगामी श्रीलंका आणि थायलंड येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांसाठी संधी मिळणार असल्याने रुद्रच्या निवडीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

रुद्रच्या या यशाबद्दल गिरधरदास देवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष कन्हैयालाल देवी, शाळेच्या सर्वेसर्वा सुनिता देवी, मुख्याध्यापिका अश्विनी क्षीरसागर, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

रुद्रच्या क्रिकेट कारकिर्दीच्या जडणघडणीत नवभारत इंग्लिश मीडियम स्कूलचे क्रिकेट प्रशिक्षक रोहित परदेशी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असून, त्यांच्या प्रशिक्षणामुळेच हे यश मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!