July 27, 2026
IMG-20260626-WA0071(1)

करमाळा, प्रतिनिधी – शहरातील एका महिलेला अपमानास्पद वागणूक देऊन तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याने ग्रामीण भागातील एकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पिडीत महिलेने करमाळा पोलिसांत फिर्याद दिली आहे.

या फिर्यादीत म्हटले आहे की, दि.२२/०६/२६ रोजी चार वाजण्याच्या सुमारास करमाळा शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील आध्यात्मिक कार्यक्रम होणाऱ्या एका मठाच्या बाहेरील रस्त्यावर महेश अशोक सुरवसे (रा. खडकेवाडी, ता. करमाळा) हा पिडीते जवळ येऊन ‘तु मला आवडते’ असे म्हणुन पिडीतेचा मोबाईल मागु लागला. त्यावेळी पिडीतेने त्यास ‘मोबाईल देणार नाही’ असे बोलले असता त्याने पिडीतेच्या हाताला धरुन तिला त्याचे जवळ ओढुन त्याच्याशी शरीर संबंधाची मागणी केली.

या फिर्यादीवरून करमाळा पोलिसांनी महेश अशोक सुरवसे (रा. खडकेवाडी, ता. करमाळा) याच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३५२ आणि ७४ नुसार गुन्हा दाखल केला असून पोलिस नाईक अशपाक शेख हे या घटनेचा तपास करत आहेत.

.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!