July 27, 2026
IMG-20260713-WA0019

करमाळा आगारात लालपरी दाखल

करमाळा, प्रतिनिधी – आमदार नारायणआबा पाटील यांच्या प्रयत्नातून करमाळा व कुर्डुवाडी आगारांसाठी प्रत्येकी पाच नवीन बस मंजुर झाल्या होत्या. सोमवारी करमाळा आगारात या बसेस प्रत्यक्ष दाखल झाल्या. या नवीन लालपरींचे स्वागत आमदार नारायणआबा पाटील यांनी केले.

यावेळी नगराध्यक्ष प्रतिनिधी तथा नगरसेवक संजय सावंत, आदिनाथचे संचालक देवानंद बागल, आबासाहेब अंबारे, रविकिरण फुके, पंचायत समिती सदस्य स्वप्नील काळे, बाजार समिती सदस्य बाळासाहेब पवार, आदिनाथचे माजी संचालक विठ्ठलभाऊ शिंदे, पंचायत समितीचे माजी सभापती गहिनीनाथ ननवरे, पंचायत समिती माजी सदस्य जयराम सोरटे, तात्या काळे, ॲड. लुणावत, घोलप, भिमराव गाडगे, उमेश सरडे, शेतकरी नेते अण्णा सुपनवर, विनोद शिंदे, गौतम वारे, बाळासाहेब अडसूळ, रामलिंग देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी करमाळा आगाराच्या वतीने आगार व्यवस्थापक प्रमोद शिंदे, स्थानक प्रमुख शिवाजी कानडे, वाहतूक निरीक्षक पंकज जाधव यांच्या हस्ते आमदार नारायण आबा पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार नारायण आबा पाटील यांनी म्हणाले की करमाळा व कुर्डुवाडी आगारांसाठी पहिल्या टप्प्यात दहा गाड्या मंजुर झाल्या आहेत. महिनाभरानंतर दुसऱ्या टप्प्यात आणखी दहा नवीन गाड्या उपलब्ध होतील. करमाळा आगारातील कर्मचारी रिक्त पदाबाबतही आपण परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचेशी बोललो असुन त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली करमाळा व कुर्डुवाडी आगारातील प्रलंबित प्रश्न सुटतील, याचा आम्हाला विश्वास आहे.

करमाळा बसस्थानक नुतणीकरणासाठीही आपण यापुर्वी भरीव निधी मंजुर करुन आणला व हे काम पुर्णत्वास नेले. जेऊर नवीन बसस्थानक बांधकाम आता पुर्ण होत आले असून लवकरच हे बसस्थानक लोकसेवेसाठी सज्ज असेल. नागरिकांच्या दळणवळणाचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे आमदार नारायण आबा पाटील यांनी सांगितले.

.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!