July 28, 2026
IMG-20260717-WA0016(1)

करमाळा, प्रतिनिधी – तालुक्यातील साडे येथील तलाठी कार्यालयात शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करून तलाठ्याला शिवीगाळ, मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, परमेश्वर सुधाकर सलगर हे साडे येथील ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) म्हणून कार्यरत आहेत. १३ जुलै रोजी सकाळी साडे येथील तलाठी कार्यालयात कामकाज सुरू असताना ज्योतीराम पांडुरंग कदम (रा. साडे, ता. करमाळा) हा कार्यालयात आला. सातबारा उताऱ्यावर पीक-पाणी नोंद हस्तलिखित करून देण्याची मागणी त्याने केली. मात्र शासनाच्या नियमानुसार अशी नोंद मोबाईल अॅपद्वारेच करता येते, असे तलाठ्यांनी सांगितल्याने आरोपी संतप्त झाला.

यानंतर आरोपीने तलाठी कार्यालयात गोंधळ घालत कर्मचाऱ्यांना बाहेर काढून कार्यालयाला कुलूप लावल्याचा आरोप आहे. त्यानंतर तलाठी कार्यालयाबाहेर उभ्या असलेल्या तलाठ्यास शिवीगाळ करत गालावर चापट मारली तसेच “तू कार्यालयात कसा येतो ते पाहतो” अशी धमकी दिली. या प्रकारामुळे सरकारी कामात अडथळा निर्माण झाल्याची तक्रार तलाठी परमेश्वर सलगर यांनी दिली आहे.

या तक्रारीवरून करमाळा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) मधील सरकारी कामात अडथळा, मारहाण, शिवीगाळ व धमकी यांसंदर्भातील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक रणजित माने यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!