July 27, 2026
IMG-20260723-WA0015

आमदार नारायण आबा पाटील यांचे स्वीय सहाय्यक संजय फरतडे यांची माहिती

करमाळा, प्रतिनिधी – आमदार नारायण आबा पाटील यांच्या आदेशानुसार दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या पावसाळी आवर्तनास सुरुवात झाली असून पाटबंधारे विभागाच्या मार्गदर्शनाखाली पावसाळी आवर्तनाचे सविस्तर वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ही माहिती आमदारांचे स्वीय सहाय्यक संजय फडतरे यांनी दिली आहे.

जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार २१ जुलैपासून २८ सप्टेंबरपर्यंत घोटी, सोनखीळा, मलवडी, पारधी, निंभोरे, भाळवणी, पांगरे, वरकुटे, नेरले, सालसे, आळसुंदे, साडे, हिसरे, फिसरे, सौंदे, शेलगाव, अर्जुननगर, गुळसडी, पांडे, कुंभेज, जेऊर, झरे, पोपळज, म्हसेवाडी, वडशिवणे आदी भागांतील तलाव, बंधारे, चाऱ्या व पाणीसाठ्यांना टप्प्याटप्प्याने पाणी सोडण्यात येणार आहे.

प्रत्येक तलाव, शेततळे व बंधाऱ्यावरील लाभार्थी शेतकऱ्यांनी पाणी मागणी अर्ज भरणे बंधनकारक असून अर्ज भरलेल्या शेतकऱ्यांनाच पाणी देण्यात येणार आहे. वीजपुरवठ्यात अडथळा किंवा मोटारीत बिघाड झाल्यास वेळापत्रकात एक-दोन दिवसांचा बदल होऊ शकतो. तसेच वेळापत्रकात नसलेल्या भागांनाही आमदार नारायण आबा पाटील यांच्या सूचनेनुसार आवश्यकतेनुसार पाणी देण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याचे फडतरे यांनी सांगितले आहे.

अधिक माहितीसाठी कनिष्ठ अभियंता देवकाते (८६२३९१८३९२), कनिष्ठ अभियंता सौंदाने (९०११०३२४७७), स्वीय सहाय्यक संजय फडतरे (७७४४०५२२२३) तसेच करमाळा तालुका विकास आघाडीचे कार्यकारिणी सदस्य राहुल गोडगे (८८०५३२६३४२) यांच्याशी संपर्क साधण्याचे तसेच शेतकऱ्यांनी पाणी वितरणात सहकार्य करण्याचे आवाहनही संजय फडतरे यांनी केले आहे.

दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या पावसाळी आवर्तनाचे वेळापत्रक

घोटी, सोनखीळा तलाव – २१ ते २३ जुलै (३ दिवस)
मलवडी चारी – २४ ते २६ जुलै (३ दिवस)
घोटी, पारधी तलाव – २७ ते २८ जुलै (२ दिवस)
घोटी गाव तलाव – २९ जुलै ते १ ऑगस्ट (४ दिवस)
निंभोरे फडतरे तलाव, भाळवणी-पांगरे ओढा – २ ते ६ ऑगस्ट (५ दिवस)
घोटी, बदर तलाव – २१ ते २४ जुलै (४ दिवस)
घोटी, वरकुटे, नेरले – २५ जुलै ते १ ऑगस्ट (९ दिवस)
सालसे गाव तलाव – २ ते ५ ऑगस्ट (४ दिवस)
आळसुंदे गाव तलाव – ६ ते ८ ऑगस्ट (३ दिवस)
साडे, मोरे लोंढे तलाव – ९ ते ११ ऑगस्ट (३ दिवस)
घोटी, सटवाई तलाव – १२ ते १५ ऑगस्ट (४ दिवस)
निंभोरे, दळवी तलाव – ७ ते ९ ऑगस्ट (३ दिवस)
निंभोरे, विठोबा तलाव – १० ते १५ ऑगस्ट (६ दिवस)
कोंढेज गाव तलाव – १६ ते १९ ऑगस्ट (४ दिवस)
साडे, सरकारी तलाव व झानपुरे ओढा – १६ ते १९ ऑगस्ट (४ दिवस)
साडे तेली तलाव, हिसरे – २० ते २३ ऑगस्ट (४ दिवस)
फिसरे पवार तलाव – १९ ते २३ ऑगस्ट (५ दिवस)
सौंदे गाव तलाव – २४ ते २५ ऑगस्ट (२ दिवस)
शेलगाव (क) बंधारे – २६ ते २९ ऑगस्ट (४ दिवस)
सरफडोह भीताडे तलाव – २४ ते २७ ऑगस्ट (४ दिवस)
शेलगाव बंधारे चारी क्र. १ – २८ ते ३१ ऑगस्ट (४ दिवस)
अर्जुननगर बंधारे – १ ते ३ सप्टेंबर (३ दिवस)
गुळसडी, बंधारे वस्ती चारी – ४ ते ६ सप्टेंबर (२ दिवस)
गुळसडी गाव तलाव – ३ ते ५ सप्टेंबर (३ दिवस)
गुळसडी यादव तलाव – ६ ते ८ सप्टेंबर (३ दिवस)
पांडे – ९ ते १३ सप्टेंबर (५ दिवस)
गुळसडी वीज विहीर तलाव – ६ ते ९ सप्टेंबर (४ दिवस)
गुळसडी देवळाली रोड – १० व ११ सप्टेंबर (२ दिवस)
कुंभेज गाव तलाव – १४ ते १५ सप्टेंबर (२ दिवस)
कुंभेज-जेऊर बंधारे – प्रत्येक टेक्निकल ब्लॉकवेळी
जेऊरवाडी जाधव नाला बंधारे – १६ ते १७ सप्टेंबर (२ दिवस)
जेऊर कोठावळे तलाव – १८ ते १९ सप्टेंबर (२ दिवस)
झरे सर्व पाणीसाठे – १४ ते १६ सप्टेंबर (३ दिवस)
पोपळज सर्व पाणीसाठे – १७ ते १९ सप्टेंबर (३ दिवस)
म्हसेवाडी तलाव – २० ते २५ सप्टेंबर (५ दिवस)
वडशिवणे तलाव – २० ते २८ सप्टेंबर (९ दिवस)

.

.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!