September 4, 2026
IMG-20260827-WA0055

करमाळ्यातील श्री बनशंकरी मोबाईल शॉपीच्या आकर्षक ऑफर्स ठरणार मंदीत संधी

करमाळा, प्रतिनिधी – पावसाने ओढ दिल्याने बाजारपेठेत मंदी जाणवत असली तरी भावा बहिणीच्या अतूट नात्याच्या रक्षाबंधन सणानिमित्त लाडक्या बहिणीला ओवाळणी देणे क्रमप्राप्त आहे. ही गोष्ट ध्यानात घेऊन शहरातील श्री बनशंकरी मोबाईल शॉपीच्या माध्यमातून केवळ १० रुपयांच्या डाउन पेमेंटसह इतर आकर्षक ऑफर आणि मोबाईल सोबत अनेक भेटवस्तूंचाही लाभ ग्राहकांना होत आहे.

या रक्षाबंधनानिमित्त शहरातील राशीन पेठ येथील श्री बनशंकरी मोबाईल शॉपीच्या वतीने मोबाईल खरेदीवर ग्राहकांसाठी विविध आकर्षक ऑफर्स जाहीर करण्यात आल्या आहेत. श्री बनशंकरी मोबाईल शॉपीमध्ये मोबाईल खरेदीवर तब्बल १५ आकर्षक गिफ्ट्स अगोदरच मोफत देण्यात येत असले तरी सध्या सुरू असलेल्या मंदीच्या पार्श्वभूमीवर कोणतीही प्रोसेसिंग फी न आकारता मोबाईल खरेदीसाठी केवळ १० रुपयांच्या डाउन पेमेंटची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. याशिवाय ऑफर कालावधीत Vivo मोबाईल खरेदीवर सहा महिन्यांपर्यंत स्क्रीन डॅमेज प्रोटेक्शन मोफत देण्यात येणार आहे.

श्री बनशंकरी मोबाईल शॉपी येथे बजाज फायनान्समार्फत मोबाईल खरेदीवर २,५०० रुपयांपर्यंत कॅशबॅक, तसेच ० टक्के व्याजदराची सुविधा उपलब्ध आहे. जुन्या मोबाईलच्या एक्स्चेंजची सुविधाही ग्राहकांना मिळणार आहे. याशिवाय UPI पेमेंटवर १० टक्क्यांपर्यंत डिस्काउंटची ऑफरही सुरू आहे.

रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर मंदीत संधी ठरू शकणाऱ्या या ऑफर्सचा ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री बनशंकरी मोबाईल शॉपीचे बसवराज (बच्चुशेठ) सोमनाथ चिवटे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ग्राहकांनी ९८९००१४२२३, ९६२३२५२५८५ किंवा ७२७६२३३७८३ यांपैकी कोणत्याही मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!