March 1, 2026
विनयभंग

मोटे दाम्पत्य अटकेत

करमाळा , प्रतिनिधी – शेतात ज्वारीचे पीक काढणाऱ्या महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी सेवानिवृत्त शिक्षकाला तर सदर महिलेला मारहाण केल्याप्रकरणी भूमि अभिलेख विभागाच्या परिरक्षण भुमापक वर्षाराणी वैजिनाथ मोटे यांच्यासह एक अल्पवयीन मुलगा आणि एका अनोळखी महिलेवर करमाळा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. करमाळा तालुक्यातील पाथुर्डी येथे ही घटना घडली आहे.

याबाबत ३५ वर्षीय पीडीतेने दि.११/०१/२६ रोजी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. १०/०१/२०२६ रोजी सकाळी ११:३० वाजण्याच्या सुमारास ती तिच्या शेतातील बाटुक (ज्वारीचे पिक) काढणी करत होती. यावेळी वर्षाराणी वैजिनाथ मोटे, वैजिनाथ अजिनाथ मोटे, एक अल्पवयीन मुलगा आणि एक अनोळखी महिला हे तेथे आले. त्यातील वैजिनाथ अजिनाथ मोटे याने पिडीतेचा विनयभंग केला व वर्षाराणी वैजिनाथ मोटे हीने हाताने मारहाण करुन शिवीगाळ व दमदाटी करुन पीडीतेच्या गळ्यातील सोन्याचे मणीमंगळसुत्र काढुन घेतले. तसेच एक अनोळखी महिला व एका अल्पवयीन मुलाने तिला शिवीगाळ व दमदाटी केली.

या फिर्यादीवरून करमाळा पोलिसांनी वर्षाराणी वैजिनाथ मोटे, वैजिनाथ अजिनाथ मोटे, एक अल्पवयीन मुलगा आणि एक अनोळखी महिला यांच्यावर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला असून हेड कॉन्स्टेबल भाऊराव शेळके या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *