करमाळा, प्रतिनिधी — गुरु गणेश दिव्यरत्न गो-पालन संस्था येथे गुरुवार, दि. १० सप्टेंबर रोजी बैल पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी गो-मातेला पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते गो-मातेची विधिवत पूजा करण्यात आली.

यावेळी प्रकाश मुनोत यांनी गोशाळेच्या कार्याचे कौतुक करून गो-मातेचे महत्त्व उपस्थितांना पटवून दिले. संस्थेचे अध्यक्ष श्रेणिक खाटेर यांनी उपस्थितांचे संस्थेच्या वतीने स्वागत केले. तसेच गोशाळा सुरू झाल्यापासून आजपर्यंतच्या कार्याचा आढावा उपस्थितांसमोर मांडला.

संस्थेचे सदस्य जगदीश शिगची यांनी स्व. गोवर्धनजी शिगची सर, स्व. कांतिभाई संचेती व श्रेणिक खाटेर यांच्यासह मित्र परिवाराच्या चर्चेतून गोशाळेची निर्मिती कशी झाली, याबाबत माहिती दिली. ह.भ.प. अमोल महाराज कालदाते यांनी आपल्या ओघवत्या वाणीने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

गोशाळा स्थापन झाल्यापासून पोपटराव कालदाते परिवाराकडून गो-मातेची सेवा केली जात असून सध्या या गोशाळेत ९० गो-मातांची सेवा सुचारूपणे सुरू आहे.

दरम्यान, यावेळी पत्रकार रितेश कटारिया व तनिश कटारिया यांच्या वाढदिवसानिमित्त गो-मातेच्या सान्निध्यात गो-पालन संस्थेच्या वतीने संस्थाध्यक्ष श्रेणिकशेठ खाटेर व सर्व सदस्यांच्या उपस्थितीत त्यांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमास अनिल सोळंकी, संतोष शेठ गुगळे, विजय मंडलेचा, प्रकाश मुनोत, राहुल संचेती, संतोष कटारिया, केतन संचेती, कचरू काका मंडलेचा, अजिंक्य गुगळे, आदेश ललवाणी, दिनेश मुथा, प्रदीप लुनिया, अक्षय मंडलेचा, अभय शिंगवी, गणेश बोरा, संजय लुनिया, नितीन दोशी, प्रीतम दोशी, वैभव दोशी, आशिष बोरा, सागर पटवा, तनिश कटारिया, शैलेश देशमाने, संगीता खाटेर, मोक्षा खाटेर, ज्योती मंडलेचा, ज्योती मुथा, छाया हिरण, चंद्रकांत कालदाते, अमोल कालदाते, विजय बरीदे, गिरीश शहा, अक्षय शिंदे, नागेश पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

.

