केतुर नं.२ मार्गावर नवीन बस देण्याची ग्रामस्थांची मागणी
करमाळा, प्रतिनिधी – नवीन बसेस दाखल होऊन तसेच नवीन आगार प्रमुखांची नेमणूक होऊनही करमाळा आगाराच्या व्यवस्थापनात काहीच बदल न झाल्याचे दिसून येत आहे. मार्गावर बंद पडणाऱ्या बसेस बाबत दररोज नवीन नवीन माहिती येत असतानाच मंगळवारी सकाळी केतुर नं.२ येथे सकाळी सव्वा नऊला पोहोचणारी बस कशीबशी सव्वा दहा ला पोहोचून तिथेच बंद पडली आहे.

सदर बसच्या इंजिनातील बिघाडामुळे बसच्या समोरील काचेवर काळे ऑइल उडत असल्यामुळे ही बस चालविण्यास चालकाला अडचण येत होती. परंतु बसमध्ये विद्यार्थ्यांसह इतर प्रवासी असल्याने बरीच कसरत करत सदर ड्रायव्हरने कशीबशी ही बस केतुर नं.२ पर्यंत आणली.

यानंतर केतुर नं.२ च्या बस थांब्या शेजारी ग्रामपंचायतच्या पाठीमागे ही बस नादुरुस्त होऊन थांबली आहे. विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेऊन या मार्गावर नवीन जिजाऊ बस देण्याची मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे.

.

.

.

.

.

.

.

