May 6, 2026
IMG-20260313-WA0039

करमाळा, प्रतिनिधी – करमाळा शहर व तालुक्यातील हॉटेल व्यावसायिकांना मिळणारा व्यावसायिक गॅस पुरवठा अचानक पूर्णपणे खंडित झाल्यामुळे हॉटेल व्यवसाय ठप्प झाला आहे. या संदर्भात हॉटेल व मिठाई असोसिएशनच्या वतीने करमाळा तहसील कार्यालयातील पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शहरातील अनेक हॉटेल व्यवसाय पूर्णपणे गॅस पुरवठ्यावर अवलंबून आहेत. अचानक गॅस पुरवठा बंद झाल्यामुळे अनेक हॉटेल्स बंद ठेवण्याची वेळ व्यावसायिकांवर आली आहे. त्यामुळे या व्यवसायावर अवलंबून असलेले कर्मचारी, कामगार तसेच रोजंदारीवर जगणाऱ्या अनेक लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे.
हॉटेलमधून अनेक मजूर, गरजू नागरिक तसेच इतर लोक रोजचे अन्न घेत असतात. तसेच काही हॉस्पिटल व इतर ठिकाणीही अन्नपुरवठा हॉटेलमार्फत केला जातो. गॅस पुरवठा बंद झाल्यामुळे या सर्व सेवांवर परिणाम झाला आहे.

सध्या हॉटेल व्यवसायावर कर्जाचे ओझे असतानाच गॅस पुरवठा खंडित झाल्यामुळे व्यावसायिकांना मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे व्यावसायिक गॅस पुरवठा तात्काळ सुरू करावा, अशी मागणी हॉटेल व मिठाई असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!