४७ कारवायांतून सव्वा लाखांवर दंड वसूल
करमाळा प्रतिनिधी – जेऊर शहरातील बेशिस्त वाहतुकीच्या तक्रारींची दखल घेत करमाळा पोलीस प्रशासनाच्या वाहतूक विभागाने मंगळवार दि.७ रोजी विविध ठिकाणी एकूण ४७ कारवाया करून रु.१,३०,५०० चा दंड वसूल केला आहे.

रेल्वे स्टेशन, विविध शैक्षणिक संस्था, महामार्ग व मोठी व्यापार पेठ असलेल्या जेऊर मध्ये बेशिस्त वाहतुकीच्या तक्रारी होत होत्या. या तक्रारीची दखल घेत उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा आणि पोलीस निरीक्षक रणजीत माने यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी जेऊर मध्ये मोटर वाहन कायद्यानुसार कारवाया करण्यात आल्या आहेत. अल्पवयीन मुले वाहन चालवणे ,ट्रिपल सीट, विदाऊट नंबर प्लेट, लायसन्स जवळ नसणे, फॅन्सी नंबर प्लेट आदी त्रुटींवर कारवाई करून दंड वसूल करण्यात आला आहे.

या कारवायांसाठीच्या विशेष पथकात स.पो.नि. दिलीप ढेरे, चालक पो.ह. निमगिरे, ट्रॅफिक अंमलदार पो.कॉ.दिपक कांबळे, पो.कॉ. चव्हाण तसेच निर्भया पथकाचे पो.ह. मंगेश पवार, पो.कॉ. संभाजी पवार, पो.कॉ. गुटाळ यांचा सहभाग होता.

.

.

.

.

.

