स्नेहगंगाश्री आळंदीकर यांची सुश्राव्य वाणी आणि पौराणिक जीवंत देखाव्यांनी शिवभक्त मंत्रमुग्ध
करमाळा, प्रतिनिधी – करमाळ्यातील भागवत कथा ज्ञानयज्ञ समिती व संत गजानन महाराज मंदिर समिती यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि.१५ ते गुरुवार दि.२१ मे दरम्यान शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक कार्यकर्ते श्रेणिकशेठ खाटेर यांच्या पुढाकाराने आयोजित या सोहळ्याची गुरुवारी उत्साहात सांगता झाली.

झी टॉकीज फेम सुप्रसिद्ध कथा वाचक स्नेहगंगाश्री (माई) शृंगारे (आळंदीकर) यांच्या सुमधुर वाणीत यावर्षीचा कथा यज्ञ दररोज सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत उत्साहात पार पडला. सुश्राव्य कथे दरम्यान आलेल्या पौराणिक प्रसंगाच्या जिवंत सादरीकरणाने या कथा यज्ञाचे शहरवासीयांना आकर्षण निर्माण झाले होते. दररोज होणाऱ्या आरती सोहळ्याचा मान सामान्य नागरिकांना देण्यात आला. पुरुष भाविकांसह महिला भाविकांची या सोहळ्यात मोठी गर्दी दिसून आली.

गुरुवारी संपन्न झालेल्या सांगता सोहळ्याला माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्यासह तहसीलदार शिल्पा ठोकडे, पोलीस निरीक्षक रणजीत माने, शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे, करमाळा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ. मोहीनी सावंत, सर्व नगरसेवक आणि जामखेड नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ. प्रांजल चिंतामणी, नगरसेवक अमित चिंतामणी, उद्योजक आकाश बाफना यांच्यासह करमाळा शहर व परिसरातील सर्व स्तरातील नागरिकांनी या सोहळ्यात उपस्थिती दर्शविली.

सप्ताहाच्या शेवटी कथावाचक स्नेहगंगाश्री (माई) शृंगारे यांनी या सप्ताह दरम्यान योगदान दिलेल्या सर्वांचे आभार मानून उपस्थितांचा तसेच यजमान श्रेणिकशेठ खाटेर आणि परिवाराचा सत्कार केला. प्रमुख उपस्थितांच्या हस्ते आरती संपन्न झाल्यानंतर शेकडो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

हा सप्ताह पार पाडण्यासाठी भागवत कथा ज्ञानयज्ञ समिती व संत गजानन महाराज मंदिर समितीच्या विठ्ठलराव भणगे, कुरुलकर मॅडम, नगरसेवक दीपक चव्हाण, रवींद्र विद्वत, चरणसिंग परदेशी, नारायण पवार, विजय देशपांडे, बबलू कुलकर्णी, गिरीश शहा, दादासाहेब तनपुरे, प्रितम वीर, शंकर रासकर, राम टांगडे, सचिन सोरटे, माजी नगरसेविका सौ. संगीताताई खाटेर, हनुमान परदेशी, संदीप चुंग, सुशील राठोड, आशिष बोरा, दिनेश मुथ्था, ज्योती मुद्दा, वैभव दोशी, कालिंदी धोकटे, कालीदास घोगरे, आडकर सर, विनोद कानडे, दिलीप शिरगिरे, मुळे सर, सुरेश आटोळे, देवकर काका यांच्यासह शहरातील व्यापारी आणि सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

करमाळा शहरात सामाजिक कार्यकर्ते श्रेणिकशेठ खाटेर यांच्या पुढाकाराने गेल्या वीस वर्षांपासून विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रम राबविले जातात. या उपक्रमामुळे शहरवासीयांना भगवानजी शर्मा यांच्या भागवत कथेपासून ओतूरकर महाराज, पंडित प्रदीप कुमार मिश्रा, रामराव ढोक महाराज, अनुराधा दीदी आदी सुप्रसिद्ध महानुभावांच्या वाणीद्वारे रामायण, भागवत आणि शिव महापुराणाच्या श्रवणाचा लाभ होत आला आहे.
-जयवंतराव जगताप,
माजी आमदार, करमाळा.

.

