July 28, 2026
IMG-20260707-WA0035

उजनी धरणामध्ये दाखल पाण्याचे गुळवे दांपत्याकडून पूजन

करमाळा, प्रतिनिधी – वरील धरणांतून होणाऱ्या विसर्गामुळे उजनी धरणात आलेल्या पाण्याचे पूजन व जलस्वागत मंगळवारी कोंढार चिंचोली येथील डिकसळ पूलावर मोठ्या उत्साहात करण्यात आले. यावेळी सोलापूर जिल्हा परिषद सदस्या सौ. वनिताताई गुळवे तसेच माजी उपाध्यक्ष श्री. सुभाषआबा गुळवे यांच्या हस्ते पाण्याचे विधिवत पूजन करण्यात आले.

यावेळी नागनाथ लकडे, सुग्रीव दोडमिसे, अजित रणदिवे, प्रा.झोळ, देविदास साळुंखे, अजिनाथ लाळगे, राजेंद्र धांडे, डॉ. गोरख गुळवे, आबा गुळवे, महेश गुळवे,भरत धायगुडे, हरिभाऊ गुळवे, विष्णुपंत देवकाते, तात्यासाहेब पाटील, रमेश माने, अतुल धांडे तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ, पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जून महिन्यात पावसाने ओढ दिल्याने तसेच महावितरणने वीज कपातीचा निर्णय घेतल्यानंतर हवालदिल झालेल्या शेतकरी वर्गात उजनी धरणात वरील धरणांतून होणाऱ्या विसर्गामुळे समाधानाचे वातावरण आहे. उजनीची प्लस कडे वाटचाल होत असताना शासनाने विनाकारण वीज कपात करून शेतकऱ्यांची गैरसोय करू नये असे आवाहन यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांनी केले आहे.

.

.

.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!