September 11, 2026
IMG-20260910-WA0081(1)

दत्तपेठ तरुण मंडळाच्या देखाव्याचे महिला अधिकारी व महिला लोकप्रतिनिधींच्या हस्ते उद्घाटन

करमाळा , प्रतिनिधी – दहीहंडीच्या निमित्ताने दरवर्षी विविध उपक्रम सादर करणाऱ्या दत्तपेठ तरुण मंडळाने यावर्षी अघोरी महाकाल सह काली महाकाली नृत्य हा जिवंत देखावा सादर केला. करमाळा विभागाच्या पोलीस उपअधीक्षक अंजना कृष्णा व्ही एस यांच्यासह स.पो.नि. गिरीजा म्हस्के, करमाळा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ. मोहिनी संजय सावंत, जिल्हा परिषद सदस्या सौ. अश्विनी गणेश चिवटे, माजी नगरसेविका सौ. संगिता श्रेणिकशेठ खाटेर, पाणीपुरवठा सभापती विक्रमसिंह परदेशी यांच्या मातोश्री सौ. कलावती विजयसिंह परदेशी, ओम महिला मंडळाच्या सौ. माधुरी साखरे आणि सौ. जयश्री महाजन यांच्या हस्ते आणि दत्तपेठ तसेच सुतार गल्ली येथील महिला वर्गाच्या प्रमुख उपस्थितीत या देखाव्याचे उद्घाटन करण्यात आले.

यानंतर करमाळा शहर विकास आघाडीचे मार्गदर्शक विठ्ठलआप्पा सावंत, सामाजिक कार्यकर्ते श्रेणिकशेठ खाटेर, सामाजिक कार्यकर्ते संतोष वारे, नगरसेवक संजय उर्फ पप्पू सावंत यांच्या हस्ते दत्तपेठ तरुण मंडळाच्या दहीहंडीचे पूजन करण्यात आले.‌

पूजनानंतर दत्तपेठ तरुण मंडळाने सादर केलेला अघोरी महाकाल आणि काली महाकाली या देखाव्याचा पहिला प्रयोग उपस्थित महिलांसाठी सादर करण्यात आला. यानंतर शहर व तालुक्यातील द किंग्ज गोविंदा पथक, श्रीदेवीचा माळ येथील राजे रावरंभा गोविंदा पथक, बोरगाव येथील शिवसाम्राज्य गोविंदा पथक आदी गोविंदा पथकांनी दत्तपेठ तरुण मंडळाच्या दहीहंडी खाली मानवी मनोरे रचून रोमहर्षक सलामी दिली. यावेळी सिने मेक अप आर्टिस्ट निलेश यादव यांनी मंडळाचे कार्यकर्ते दिनेश ममदापूरे यांची श्रीकृष्णाच्या रुपात आकर्षक वेशभूषा केली होती. या सजीव श्रीकृष्णासोबत सेल्फी काढण्यासाठी उपस्थितांनी गर्दी केली होती.

यादरम्यान दत्तपेठ तरुण मंडळाच्या दहीहंडी उत्सवाच्या व्यासपीठावर भेट देणाऱ्या पैलवान पृथ्वीराज पाटील, पैलवान सुधाकर काका लावंड, उपनगराध्यक्ष अतुल फंड, माजी उपनगराध्यक्ष ॲडव्होकेट कमलाकर वीर, नगरसेवक प्रशांत ढाळे, रवींद्र जाधव, दादा इंदलकर, हुमरान मुलाणी, पैलवान सुनील सावंत, पैलवान गणेश सावंत, विशाल राठोड, मिलिंद फंड, श्रीकांत ढवळे, सुखदेव लष्कर आदी मान्यवरांचा मंडळातर्फे सत्कार करण्यात आला. रात्री नऊ नंतर विविध पथकांनी मानवी मनोरे रचत दत्तपेठ तरुण मंडळाची दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र बरोबर दहा वाजता शहरातील ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या द किंग्ज गोविंदा पथकाच्या गोविंदांनी पाच थर रचत ही दहीहंडी फोडली.

दहीहंडी फोडल्यानंतर दत्तपेठ तरुण मंडळ तसेच श्रेणिकशेठ खाटेर युवा मंचचे अमोलसिंग परदेशी, अभय महाजन, संग्रामसिंह देशमुख, चरणसिंग परदेशी, विश्वजीत परदेशी, भूषण खुळे, वर्धमान खाटेर, ॲड.संकेत खाटेर, धनराज महाजन, कृष्णा येळवणे आदींच्या हस्ते ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटचे संस्थापक आणि द किंग्ज गोविंदा पथकाचे मार्गदर्शक महेश निकत आणि गोविंदा पथकाला मानाची ट्रॉफी प्रदान करण्यात आली. यानंतर द किंग्ज ग्रुपच्या सदस्यांनी जोरदार जल्लोष केला.

कार्यक्रमाच्या शेवटी पाणीपुरवठा व दिवाबत्ती समितीचे सभापती विक्रमसिंह परदेशी यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. चंद्रशेखर जोगळेकर यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. राष्ट्रगीताने दत्तपेठ तरुण मंडळाच्या दहीहंडी उत्सवाची सांगता करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!