June 10, 2026
IMG-20260605-WA0013

करमाळा, प्रतिनिधी – बहिणीला मारहाण केल्याबाबत जाब विचारण्यासाठी गेलेल्या व्यक्तीस शिवीगाळ, दमदाटी व मारहाण करून दगडाने जखमी केल्याप्रकरणी कंदर येथील पिता-पुत्राविरुद्ध करमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मल्हारी अंकुश चव्हाण (वय-३५ वर्षे, रा. कंदर, ता. करमाळा) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. ४ जून २०२६ रोजी दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी हे त्यांची बहीण सुरेखा हिला मागील रात्री का मारहाण केली, याची विचारणा करण्यासाठी चुलत बहिणीचा मुलगा राहुल बाळू शिरतोडे याच्या घरी गेले होते.

यावेळी राहुल शिरतोडे व त्याचे वडील बाळू शिरतोडे यांनी फिर्यादीस शिवीगाळ व दमदाटी केली. त्यानंतर बाळू शिरतोडे यांनी हाताने मारहाण केली, तर राहुल शिरतोडे याने जवळ पडलेला दगड डोक्यात मारुन फिर्यादीस जखमी केले.

या फिर्यादीवरून करमाळा पोलिस ठाण्यात राहुल शिरतोडे व त्याचे वडील बाळू शिरतोडे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 118(1), 115(2), 351(2), 352 व 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक मेहेर करत आहेत.

.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!