करमाळा, प्रतिनिधी – दुर्गराज रायगड येथे शनीवार दि.६ जून रोजी ३५३ वा शिवराज्याभिषेक सोहळा पार पडणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी करमाळा शहर व परिसरातून तब्बल २५० शिवभक्त गुरुवारी सायंकाळी उत्साहात रवाना झाले.

बुधवारी सायंकाळी शहरात जोरदार पाऊस पडत असतानाच कोणत्याही परिस्थितीत रायगड येथील शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी दरवर्षी नित्यनेमाने हजर राहणारे शिवभक्त भर पावसात छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर एकत्र आले. छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून आणि जयजयकाराच्या घोषणा देत या तरुणाईने लक्झरी बसेसह सात मोठी वाहने आणि २१ दुचाकींवरुन रायगडाकडे उत्साहात कूच केले.

वाहनांमधून शिवरायांचा जयजयकार करत आणि शिव गीते आणि शिवरायांचा पाळणा गात रायगडाकडे प्रस्थान करण्याचे करमाळ्यातील शिवभक्तांचे हे पाचवे वर्ष आहे. या सोहळ्यासाठी परस्पर समन्वयाने वाहनांसह प्रवासातील शिदोरीचे सुयोग्य नियोजन केले जाते.

.

.

.

.

