August 6, 2026
IMG-20260729-WA0038(1)

नवोदितांना स्वलिखित कविता सादर करण्याची संधी

करमाळा, प्रतिनिधी – उभरत्या तसेच अनुभवी कवींसाठी आपल्या प्रतिभेला अभिव्यक्ती देण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून देणाऱ्या ‘शब्दबाज ओपन माईक’ या काव्य सादरीकरण कार्यक्रमाचे आयोजन रविवार, दि. २ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता करण्यात आले आहे. हा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, करमाळा येथील विजयश्री सभागृहात संपन्न होणार आहे.

‘तुमचा आवाज… तुमचं व्यासपीठ… येथे प्रत्येक शब्दाला दाद मिळते!’ या घोषवाक्याखाली आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात फक्त स्वलिखित कवितांचे सादरीकरण करता येणार आहे. प्रत्येक सहभागी कवीला तीन मिनिटांचा कालावधी दिला जाणार असून, कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नावनोंदणी आवश्यक आहे. इच्छुकांनी नावनोंदणीसाठी 7057102097 / 8055390214 / 8779527002 यांपैकी कोणत्याही एका मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

कवितेला स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि नवोदित कवींना प्रोत्साहन देणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे. या कार्यक्रमात सहभाग पूर्णपणे विनामूल्य असून इच्छुक कवी-कवयित्रींनी वेळेत नावनोंदणी करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

.

.

.

.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!