करमाळा, प्रतिनिधी – करमाळा नगरपालिकेचे नगरसेवक व करमाळा शहर विकास आघाडीचे गट नेते संजय (पप्पू) सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या बुधवार दि.२२ रोजी प्रा. गणेश शिंदे यांचे “जीवन सुंदर आहे” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम शहरातील सावंत गल्ली येथील सावंत गल्ली गार्डन येथे संपन्न होणार आहे. जीवनाकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहण्याचा संदेश देणाऱ्या या प्रेरणादायी व्याख्यानाचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

शहरातील सावंत गल्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, शहर व तालुक्यातील सर्वांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

.

.

.

