करमाळा आगारातील बसेसचा बेभरवसा चव्हाट्यावर
करमाळा, प्रतिनिधी – तालुक्यातील कर्जत–करमाळा मार्गावरील एसटी बसेस विविध कारणांनी वारंवार बंद पडत असल्याने शाळकरी मुलींनी बसला लिंबू–मिरची बांधून प्रतीकात्मकरीत्या तिची ‘नजर उतरवली’ आणि प्रशासनाचे लक्ष वेधले.

करमाळा-कर्जत या मार्गावरून दररोज मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षणासाठी कर्जत येथे ये-जा करतात. मात्र बससेवेच्या अनियमिततेमुळे सकाळी १० वाजता शाळा असतानाही विद्यार्थ्यांना पहाटेपासून बसस्थानकावर थांबावे लागत असल्याची खंत विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

बससेवा सुरळीत व्हावी व विद्यार्थ्यांच्या अडचणींची दखल शासनाने घ्यावी, अशी मागणी विद्यार्थिनी प्रतिष्ठा शिंदे हिने केली. विद्यार्थीनींच्या या अनोख्या आंदोलनाची परिसरात चांगलीच चर्चा रंगली आहे.

.

.

.

.

.

